जळगाव जामोद दि.२ – येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर दिनांक 28 ऑगस्ट पासून स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत डिक्कर आमरण उपोषणाला बसले होते. दिनांक 30 ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषण मंडपामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस नाईक शांतीलाल धीरबस्सी व पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे हे रात्रपाळीत उपोषण मंडपात आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी डिक्कर यांनी लघवी करून येतो म्हणून उपोषण मंडपातून निघून गेले. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांनी कारवाईत कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली असून, या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई. ही कारवाई चुकीची असून डिक्कर यांची ही स्टंटबाजी असते.
त्यामुळे या दोन्हीही पोलीस कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी यासाठी दिनांक एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष नागेश भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे न घेतल्यास दिनांक सात सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे उपोषणास बसणार असल्याचे नमूद केले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर,आनंद सपकाळ,वैभव येनकर,प्रमोद येऊल,रोहित वानखेडे, गोपाल वानखडे,निखिल वानखडे हे उपस्थित होते.