Site icon सक्रिय न्यूज

तरुण शिक्षकाची आत्महत्या…..!

बीड दि.६ – खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.६) रोजी बीड तालुक्यातील अंथरवन पिंप्री येथे सकाळी घडली.
तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथील खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अंकुश पवार (वय-33) यांनी आज सकाळी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील शिक्षकाचे स्टेटस घरच्या मंडळी पाहिल्यानंतर माळरानानजीक पळाले मात्र तोपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. तात्काळ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योती मालवली होती. 

                दरम्यान, पैशांचा तगादा व जीवे मारण्याच्या धमकीमुळे आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत लिहिले असल्याचे बोलल्या जात असून चिठ्ठीत उल्लेख केलेले माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे सांगितल्या जात आहे.
शेअर करा
Exit mobile version