केज दि.११ – मराठा आरकक्षणा संदर्भात अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून आता गावा गावातून मोर्चे आंदोलने सुरू झाले आहेत. याच अनुषंगाने केज तालुक्यातील सारणी (आ) येथे सोमवारी गावातून सकल मराठा समाजाने रॅली काढली व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील केले.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षण आंदोलनास बसले असताना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर लाठीचार्ज केला व हवेत गोळीबार करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध सारणी (आ) ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी गावातील तरुण, जेष्ठ व महिला यांनी गावातून मोठ्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला. यामध्ये भजनी मंडळ, ढोल ताशे घेऊन हा मोर्चा सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करून आपल्या मनतील खदखद व्यक्त केली.