केज दि.११ – केज अंबाजोगाई रोडवरील दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या माऊली जिनिंग च्या समोर कार आणि दुचाकीच्या अपघातात तिघे गंभीर झाल्याची घटना सोमवारी (दि.11) संध्याकाळी सात च्या दरम्यान घडली. Bike car accident on Kaij Ambajogai road, three injured
केज बीड रोडवर माऊली जिनिंग च्या समोर केजहून जवळबन कडे जाणाऱ्या दुचाकीची (MH44AB8833) अंबेजोगाई कडून येणाऱ्या कारची (MH25R6150) धडक झाली.यामध्ये जवळबन येथील महादेव जोगदंड, चैतन्य जोगदंड आणि अन्य एक तरुण (वैरागे) गंभीर जखमी झाले. सदरील अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून कारचेही समोरील भागाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच तिघा जखमींना अंबाजोगाई च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.