केज दि.९ – कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी जिल्ह्यातील बीड शहरासह अंबाजोगाई, आष्टी, केज आणि परळी या पाच शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढला आहे.
सदरील आदेशानुसार दिनांक 12/08/2020 रोजी रात्री 12.00 वा. पासून ( दिनांक 11 व 12 मधील रात्र ) बीड, परळी, अंबाजोगाई आष्टी व केज हि शहरे 10 दिवसांकरिता ( दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत ) पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद राहतील. सदरील शहरांमध्ये केवळ दूध विक्री घरपोच सकाळी 07.00 वा पासून ते सकाळी 09.00 वा पर्यंतच सुरू राहील, खाजगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने ( सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दिनांक 11/08/2020 रोजी पर्यंत खरेदी करुन घ्यावीत. ) घरगुती गॅस सिलेंडर सेवा ( संबंधित एजन्सी धारकांनी आपले एजन्सी चा गणवेश परिधान करावा व सोबत आपले आळखपत्र बाळगणे आवश्यक, जार वाटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोवीड -19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी. तसेच सर्व वाटर सप्लाय कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी. या शहरांमध्ये इतर सर्व सेवा / फळे भाज्या इ.दुकाने / इतर सर्व दुकाने / खाजगी आस्थापना / बँक / पेट्रोलपंप / किराणा दुकाने ( होलसेल सह ) / कृषी विषयक दुकाने ( होलसेलसह ) / शासकीय कार्यालये , ( महसूल / पोलीस / आरोग्य / ग्रामविकास / नगरविकास / विद्युत वगळून ) बंद राहतील. तसेच या शहरांमधील कोणतीही व्यक्ती अति तातडीच्या वैद्यकीय गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीसाठी घराबाहेर / शहराबाहेर जाऊ शकणार नाहीत . फक्त ई – पास घेऊनच असा प्रवास करता येईल. या शहरामध्ये सुध्दा केवळ याबाबींसाठीच ई – पास घेऊनच प्रवेश करता येईल. वरील कालावधीनंतर लगेचच शहरांत गर्दी होऊ नये यासाठी विविध प्रकाराची दुकाने वेगवेगळया दिनांकास सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी वरील प्रमाणे कारवाई करावी या दृष्टीने बीड शहरातील सर्व किराणा / खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दुकाने अॅन्टीजन टेस्ट झालेली नसेल तरीही त्वरीत उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु त्यांनी त्यांची अंन्टीजेन तपासणी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच करुन घ्यावी. तसेच दिनांक 08 व 09 ऑगस्ट 2020 रोजी ज्या दुकानदारांची अॅन्टीजेन तपासणी झालेली आहे त्यांनीही दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी दुकाने उघडण्यास हरकत नाही. या पुढे ज्या कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना कोणतेही लक्षणे नसतील त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन आणि त्यांच्या घरीच विलगीकरण ची व्यवस्था समाधानकारकपणे होऊ शकेल याची खात्री केल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरण ( Home Quarantine ) ची परवानगी देण्यात येईल. परंतु त्यांनी त्या विषयांचे लेखी शपथपत्र सादर करणे आणि पल्स साठी अॉक्सीमिटर विकत घेऊन प्रत्येक तासाला स्वतः चे व कुटुंबातील सदस्यांचे रक्तातील अॉक्सीजनचे प्रमाण तपासणे बंधन कारक राहील. अशा प्रकारचा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान माजलगाव शहरही वरीलप्रमाणे बंद राहणार असल्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली असल्याने एकूण सहा शहरात लॉक डाउन राहणार आहे.
सदरील लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आलेख कमी होण्यास नक्कीच मदत होईल.