केज दि.१५ – तालुक्यातील गांजी शिवारातील बांधावर असलेली चंदनाची झाडे चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरची कारवाई एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने शुक्रवार दि.१५ रोजी केली.
एएसपी पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे गांजी ता.केज शिवारामध्ये चंद्रकांत पटणे यांचे शेताचे बांधावरील चंदनाची झाडे दोन इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या तोडून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गीते, विकास चोपणे,अनिल मंदे व प्रकाश मुंडे यांना देऊन तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार गांजी ते सोनीजवळा जाणारे रोडचे दक्षिण बाजूस चंद्रकांत पटणे यांच्या शेताकडे जाऊन छापा टाकला असता दोन इसम जागीच मिळून आले. त्यांना पंचासमक्ष त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे रणजीत निवृत्ती बचुटे रा.गांजी ,विद्वान प्रभू रणदिवे रा.तांदुळजा ता.जि. लातूर असे सांगितले. तर सदरचा चंदनाचा माल कोणास विक्री करता असे विचारले असता,त्यांनी सदरचा चंदनाचा माल आम्ही बालू उर्फ बालाजी जाधव रा.केज व कनकेश्वर गायकवाड रा. मुरुड ता.जि. लातूर यांना विक्री करतो असे सांगितले.सदर कारवाई मध्ये एकूण 57,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांना पोलीस स्टेशनला आणून वरील दोन आरोपी व चंदनाचा माल घेणारे बालू उर्फ बालाजी जाधव रा.केज व कनकेश्वर गायकवाड रा.मुरुड ता. जि. लातूर यांचे विरुद्ध पोलीस ठाणे युसूफडगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील कर्मचारी बालासाहेब डापकर दिलीप गीते, अनिल मंदे, प्रकाश मुंडे, विकास चोपने यांनी केली आहे.