केज दि.२० – शहरामध्ये अतिशय दुःखद आणि वेदनादायक घटना घडली असून स्वयं अध्ययनातून एमबीबीएस पूर्ण केलेली आणि उच्च शिक्षणासाठी (एमडी) तयारी करत असलेल्या तरुण डॉक्टरचे डेंगूणे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शफाओद्दीन इनामदार (रा.कळंब रोड केज) यांची फौजीया इनामदार नामक मुलगी नुकतेच जालना येथून एमबीबीएस पूर्ण करून एमडी अभ्यासक्रमाची तयारी करत होती. मात्र मागच्या आठवड्यात तिला ताप आल्याने तपासणी केली असता डेंग्यूचे निदान झाले आणि अंबाजोगाई येथे उपचारा दरम्यान बुधवारी पहाटेच्या दरम्यान तिचे दुर्दैवी निधन झाले. अतिशय हुशार, निष्णात आणि स्वयं अध्ययनातून उच्च शिक्षणा पर्यंत मजल मारलेल्या फौजीयाचे अकाली निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
दरम्यान, मागच्या महिन्यातही क्रांतीनगर भागातील एकाचे डेंग्यूने निधन झाले होते.आणि मागच्या बऱ्याच दिवसांपासून शहरात डेंग्यू चे रुग्ण वाढत आहेत.त्यामुळे नगरपंचायत ने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.