Site icon सक्रिय न्यूज

वक्रतुंड गणेश मंडळाने सफाई कामगारांना दिला आरतीचा मान….!

केज दि.२५ – वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने होत असलेल्या सात दिवसीय भागवत कथा या कथेचा पाचवा दिवस संपन्न झाला. यामध्ये कृष्ण जन्म कृष्ण जन्माचा सुंदर असा देखावा साकारण्यात आला. यामध्ये कृष्णाच्या भूमिकेमध्ये चार वर्षीय समर्थ महेश जाधव याने सुंदर असी कृष्णाची भूमिका पार पाडली.
       तर सायंकाळी आठ वाजता गणेश आरती कुठलेही राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ते न बोलावता अहोरात्र कष्ट करून व सर्व गावची साफसफाई करणारे करणारे केज नगरपंचायत चे सर्व सफाई कामगार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
                  दरम्यान, सामाजिक व सर्व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन एक नवीन व अनोखा उपक्रम सतत वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने केला जातो. यातून एकीचे प्रतीक दाखवण्याचं काम हे वक्रतुंड गणेश मंडळांनी केले आहे. त्याम सर्व स्तरातून वक्रतुंड गणेश मंडळ प्रशांत नगर यांचे विशेष कौतुक होत आहे.
शेअर करा
Exit mobile version