Site icon सक्रिय न्यूज

ईद ए मिलादच्या सार्वजनिक सुट्टी मध्ये बदल….!

मुंबई दि.27- ईद मिलाद निमित्तच्या सार्वजनिक सुट्टी मध्ये बदल करण्यात आला असून गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त असलेली सार्वजनिक सुट्टी दिनांक 29 रोजी देण्यात येत असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे.

               गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी असते. मात्र त्याच दिवशी गणेश विसर्जन आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात. आणि ईद-ए-मिलाद निमित्तही मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर जुलूस काढल्या जातात. त्यामुळे दोन्ही सणा निमित्त लोक बाहेर येत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ईद-ए-मिलाद निमित्त असलेली दिनांक 28 सप्टेंबर रोजी ची सार्वजनिक सुट्टी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहे.
                       दरम्यान, बहुतांश शासकीय व निमशासकीय कार्यालयांने गणपती विसर्जनाचीही सुट्टी आपापल्या अधिकारात दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार असून आपापले सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version