केज दि.30 – तालुक्यातील आनंदगाव आणि सारणी येथे सामाजिक सलोखाराखत विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्यात आला आनंदगाव येथे डीजेला फाटा देऊन टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गणेश विसर्जन करण्यात आले तर सारणी येथे गावातील पाच गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची एकत्रित मिरवणूक काढत विसर्जन करून एकीचे दर्शन घडवून दिले.
तालुक्यातील आनंदगाव येथे खंडेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणपती रंगभरण स्पर्धा, मातीचा/शाडूचा गणपती बनवणे, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा घेतल्या गेल्या.तर खुल्या गटातील स्पर्धकांसाठी निसर्गचित्र रेखाटन व रंगभरन, मातीचा/शाडूचा गणपती बनवणे संगीत खुर्ची, रांगोळी, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
दरम्यान, आनंदगाव येथे डिजे ला फाटा देत टाळ मृदंगाच्या गजरात गणेशाचे विसर्जन करण्यात आले.तर सारणी येथे गावातील पाच गणेश मंडळाने एकत्रित मिरवणूक काढून सामाजिक सलोखा कायम ठेवला.