Site icon सक्रिय न्यूज

तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला…..!

केज दि.३० – तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून सदरील मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास सुरू आहे.

           चंद्रकांत नरसू टिळवण  (३०) रा. गोटेगाव ता. केज असे मृत युवकाचे नाव आहे. सदरील युवक हा तहसील कार्यालय परिसरातील एका हॉटेलवर मजुरी काम करून केज शहरात राहत होता.मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहाच्या एका गाड्यावर चंद्रकांत टिळवण या युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.
               सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version