Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात मोफत दांडिया क्लासेसचे आयोजन…..!

केज दि.४ – नवरात्र महोत्सव 2023 च्या निमित्ताने केज शहरातील मंगळवार पेठ येथील  महिलांनी एकत्र येवून अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुप च्या माध्यमातून परिसरातील इछुक महिला व मुलीं करिता मोफत डांडिया क्लासेसचे चे आयोजन करण्यात आले आहे.
                केज येथील मंगळवार पेठेत सुनीता राऊत, साधना जमाले ,अस्मिता एखंडे,अस्मिता जमाले, दामिनी जमाले, राजश्री  गवळी, स्वाती गवळी, अनिता मुंडे,अर्चना सत्वधर,वनिता सत्वधर, श्वेता जाधव, मयुरी राऊत आदी महिलांनी अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला आहे.नवरात्र महोत्सवा निमित्त 04 आक्टोबर 2023 पासून मोफत दांडिया क्लासेस जूनी बालाजी टॉकीज मंगळवार पेठ केज येथे आयोजन करण्यात आले आहे.
                तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परिसरातील इछुक महिला, मुलींनी या सुवर्ण संधिचा लाभ घेण्याचे आवाहन या दांडिया क्लासेसच्या आयोजकांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version