अंबाजोगाई दि.५ – श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव किरण पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी योगेश्वरी देवी मंदिर येथे किरण पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर श्री खोलेश्वर मंदिर येथे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तर शहरातील गो शाळा येथे गोमातेस पशु आहार देण्यात आला.तसेच अंबाजोगाई शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय येथे महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या. त्यामध्ये तहसील कार्यालय, पोस्ट ऑफिस, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन येथे प्रतिमा वाटप करण्यात आल्या.यावेळी कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी हजर होते.
तर मूकबधिर व अपंग शाळेत विद्यार्थ्यांना फळ व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळेतील प्राचार्य व शिक्षक आधी उपस्थित होते.
श्री व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय येथे
शालेय व कॉलेज स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा आदि स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी महादेव ठोंबरे जी.बी. चौधरी श्रीमती पवार, श्रीमती वैष्णव विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श जाधव उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन अक्षय
सिरसट यांनी तर आभार श्रीमती गाढवे यांनी मांडले.