केज दि.५ – कुटुंबियांसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या व पाण्यात बुडू लागलेल्या दहा वर्षाच्या बालिकेला वाचवण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. सदरील घटना अंबासाखर ते लोखंडी सावरगाव महामार्गावर असलेल्या तलावात घडली आहे. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील नवीन प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लगत असलेल्या तलावात दोन कुटुंब कपडे धुण्यासाठी दुपारी (दि. 5) रोजी गेले होते.
दरम्यान, अश्विनी लहु जाधव (वय 10) ही मुलगी बुडू लागल्यामुळे रोहित परमेश्वर चव्हाण (वय 16 ) या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलालाही स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.