Site icon सक्रिय न्यूज

केज बीड रोडवरील बीएसएनएल ऑफिस समोर अपघात….!

केज दि. ६ – बीड रोडवरील बीएसएनएल ऑफिसच्या समोर एका अज्ञात वाहनाने टमटमला धडक दिल्याने टमटम मधील दोन ते तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे

             सदरील अपघातामध्ये टमटमचे मोठे नुकसान झालेले आहे त्यावरूनच अज्ञात वाहनाने अतिशय वेगात टमटमला धडक दिल्याचे दिसून येत आहे. अपघात घडल्यानंतर पत्रकार विजय आरकडे यांच्यासह अन्य स्थानिकांनी जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. सदरील अपघात ग्रस्त तालुक्यातील जोला सासुरा येथील असल्याचे घटनास्थळी बोलल्या जात होते. मात्र अद्याप सदरील अपघात नेमका कसा झाला आणि जखमी नेमके कुठले आहेत हे स्पष्ट झालेले नाही. तर टमटम ला धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाले आहे.
शेअर करा
Exit mobile version