बीड दि.7 – एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड शहरामध्ये पाच ठिकाणी ऑनलाईन बिंगो चक्री जुगार अड्ड्यावर धाडी टाकून एकूण 3,72,930/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये सदरील चक्रीचे थेट दिल्ली कनेक्शन दिसून आले असून पाच गुन्हे दाखल करून सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दिनांक 7 रोजी एएसपी पंकज कुमावत यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेशीत करून बीड शहरात रेड करण्याचे सांगितले. त्यानुसार बीड शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यावर रेड केल्या असून ऑनलाइन बिंगो चक्रीच्या कारवाया करून 5 गुन्हे दाखल केले आहेत.त्यामध्ये एकूण 3,72,930/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व एकूण 17 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सिद्धार्थ नागड रा.लक्ष्मीनगर नवी दिल्ली येथील राहणारा असून तो ऑनलाइन बिंगो चक्री साठी id पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे ऑनलाइन बिंगो चक्रीचे कनेक्शन दिल्ली पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पीएसआय राजेश पाटील, पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गीते,पोलीस नाईक अनिल मंदे,पोलीस अंमलदार महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे, शमीम पाशा, गोविंद मुंडे, भरत शेळके यांनी केली.