केज दि.14 – शहराच्या पूर्वेकडे असलेल्या एका खदान आणि तळ्याच्या परिसरात तीन बालके बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सदरील बालकांना पाण्याच्या बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदरील बालकांबद्दल सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. परंतु अविनाश संतोष घोडके, सोमेश्वर गजानन वाघमारे, वैष्णवी गजानन वाघमारे अशी बालकांची नावे सांगण्यात येत आहेत. सदरील घटनेमुळे केज शहरांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, तीन बालकांना बाहेर काढण्यात आले असून एकूण पाच बालके बुडल्याची चर्चा सुरू आहे.