Site icon सक्रिय न्यूज

आता विद्यार्थ्यांसाठीही ”वन नेशन वन स्टुडन्ट आयडी” पद्धत होणार सुरू….!

APAAR ID For All Students One Nation One Student ID : आता शिक्षकांना नव्या  कामाची भर पडली आहे. यामध्ये आतापर्यंत शिक्षकांना आधार लिंक करणे त्याच बरोबर त्याचे student id पाहणे यासर्व बाबी कराव्या लागत होत्या. आता नव्याने आणखी कामात भर पडली आहे. ती म्हणजे APAAR ID  ची.

काय आहे APAAR ID ?

नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट आयडीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री (APAAR ID) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटली साठविण्यात येणार असून, ती हवी तेव्हा ऑनलाइन पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा किंवा त्याच्या मागील शैक्षणिक बाबी पाहता येणार आहेत .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी (One Nation One Studet Id) ‘च्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री (Automated Permanent Academic Registry ID) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळे विद्यार्थ्याला एक विशेष क्रमांक मिळणार आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटली साठविण्यात येणार असून, ती हवी तेव्हा ऑनलाइन पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाचे ‘मॉनिटरिंग ‘ करता येणार आहे.

APAAR ID कशासाठी ?

– एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश घेणे.
– युनिक आयडीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण घेणे शक्य होईल.
– विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास, त्याचे यश आदींची माहिती होईल.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती ठेवणे; तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
– या कार्डचा वापर उच्च शिक्षण घेण्यासाठी; तसेच रोजगाराच्या संधी मिळवण्याबाबत होईल.
– निकाल, लर्निग आउटकम्स, क्रीडा, कला, कौशल्य, हेल्थ कार्ड, आदींची माहिती होईल.
– या आयडीच्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून होणाऱ्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, विविध लाभ ट्रान्स्फर करण्यासाठी होऊ शकेल.

हे आयडी काढण्याबाबत महाराष्ट्रसह इतर राज्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने ‘अपार आयडी (APAAR ID)’ तयार केला जाणार आहे. यातून जमा होणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यात परीक्षेचा निकाल, समग्र अहवाल कार्ड, विद्यार्थ्यांने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्रात विद्यार्थ्याने मिळवळलेले यश आदींची माहिती राहणार आहे, असे संजय कुमार यांच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

शेअर करा
Exit mobile version