बीड दि. 17 – महाराष्ट्र शासन सर्वच खात्यातील नौकर भरती कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने करण्याचे शासन निर्णय पारीत करत आहे. जि.प. शाळा, विविध शासकीय कार्यालयात दत्तकिकरण योजना लागू करत आहे. शाळासमुह योजना लागू करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबीत आहे. त्यामुळे पालकांचे तसेच त्यांच्या उच्चशिक्षित पाल्यांचे शासकीय नोकरीत जाण्याचे स्वप्न उद्धस्त झाले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक कर्मचारी यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेतीमालास किफायतशीर भाव नाही. बेरोजगारांना शासकीय नोकरीची हमी राहिली नाही. तसेच हाताला काम नाही. या चिंतेने तसेच राज्यसरकार खाजगीकरणाबाबत निर्गमित करत असलेल्या शासन आदेशामुळे राज्यातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी कामगार या सर्व समाज घटकांमधे प्रचंड नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे .तो प्रकट करण्यासाठी बीड जिल्हयातील सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, युवक, कामगार इ. विविध संघटनांनी एकत्र येऊन खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी शांततामय मार्गाने भव्य जनआक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. यात सर्व शिक्षक संघटनांसोबत इब्टा शिक्षक संघटनेचाही सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे इब्टा शिक्षक संघटनेच्या सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी सभासद शिक्षक बंधू भगिनी यांनी मोर्चात हजारोच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने अनिल विद्यागर, मदन सोनवणे यांनी केले आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून 1) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमाच्या 62 हजार शाळा दत्तक देण्याचा दि. 28 सप्टेबंर 2023 चा शासनादेश मागे घेणे.2) शासकिय विभाग, निमशासकिय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर अस्थापनातील 138 प्रकारच्या कर्मचार्यांची भरती बाह्य यंत्रणेकडुन (कंत्राटदारांकडुन) कंत्राटी पद्धतीने भरती करणारा शासनादेश रद्द करणे. 3) 15 हजार शाळा बंद करून मोजक्या समुह शाळा सुरू करून ग्रामीण शिक्षण व्यवस्था उद्वस्त करणारे दि. 21 सप्टेंबर 2023 चे परिपत्रक रद्द करणे 4) सरकारी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्राचे खाजगीकरण करणारा दि.04 ऑक्टोबंर चा शासनादेश रदद करणे. 5) शासकिय कर्मचार्यांचे सुरक्षा कवच कलम 353 पूर्ववत करणे. 6) शेतकर्यांना शेतीसाठी 24 तास मोफत वीज पुरवठा करणे. 7) सर्व सुशिक्षित बेरोजगारांना शासकिय नोकर्या व नोकरी मिळेपर्यंत बेकार भत्ता देणे. 8) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वानाच जुनी पेन्शन योजना लागू करणे. 9) बीड जिल्हयातील सर्व पिकांना 100 % पिक विमा मंजुर करून शेतकर्यांना तात्काळ लाभ देणे. 10) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालास उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा भाव देणे.11) अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, शालेय पोषण अहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करणे. 12) विनाअनुदान धोरण रद्द करून सर्व शिक्षण संस्थांना 100 % अनुदान देणे. 13) शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव देणारी शासकीय केंद्रे चालू करावीत. 14) कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडयात दुष्काळ जाहिर करावा व शेतकर्यांना सरसकट 50 हजार रूपये हेक्टरी मदत जाहीर करून तात्काळ देणे. 15) सर्वच शासकिय निमशासकिय कार्यालयातील रिक्त पदे त्वरीत भरणे. 16) दि. 07 मे 2021 चा मागासवर्गीयांची पदोन्नती रोखणारा शासन निर्णय रद्द करणे. 17) युपीएससी एमपीएससीच्या सर्व परिक्षा निशुल्क करून थेट केलेल्या नियुक्त्या रद्द करणे.
इत्यादी मागण्या मंजुर करून घेण्यासाठी दि. 22 ऑक्टोबंर 2023 रोजी वेळ सकाळी 10 वाजता सिध्दीविनायक कॉम्पलेक्स बीड येथे एकत्र येऊन शहर पोलिस ठाणे-अण्णाभाऊ साठे चौक -छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे अवाहन इब्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष-अनिल विद्यागर, सचिव-मदन सोनवणे, माजी सचिव-एकनाथ राहिंज,उपाध्यक्ष-सतिष चिंचकर, जानकिराम कुरुंद, सुरेश कांबळे, शाहुराव जायभाये, नानासाहेब राख, शेख चाँदपाशा, अनिल गायसमुद्रे, गणेश वाघ, सहसचिव-सोमिनाथ दौंड, सुषेन भोसले, बापु खंदारे, विठठल देवडे, रवि भंगवाड, बाळू शिंदे, कार्याध्यक्ष -सुनिल येडे , बाबासाहेब गायकवाड, अशोक दिवटे, हरिभाऊ धेंडे, सहकार्याध्यक्ष -धर्मराज भारती, शिवदास राठोड, नवनाथ फुलझळके, दिलीप डोळस, तिरगुळ रमेश, बाबासाहेब साळवे, संघटक सभासद-सुरेश पारवे, प्रभू कोयटे, दिंगाबर देवकत्ते, जितेंद्र औताने, सुदाम राऊत,राजेंद्र गुंजाळ, अप्पासाहेब सुरवसे, सतिष पवार,उत्तरेश्वर वंजारे, बीड ता.अध्यक्ष-आत्माराम वाव्हळ, गेवराई ता. अध्यक्ष-विकास घोडके, परळी ता.अध्यक्ष-राम मंत्रे, शिरूर ता.-शिवाजी सानप, धारूर ता.अध्यक्ष-बालासाहेब मंदे, माजलगाव ता.-उघडे अश्चर्य , पाटोदा ता.अध्यक्ष-राजेंद्र गोरे, संतोष कदम, आष्टी ता.-विश्वनाथ जगताप, महिला जिल्हा पदाधिकारी-माया तेलंग, सुनिता गायकवाड, आशा सुरवसे, राधा अंकुटे, अनिता गायकवाड, संगिता कांबळे, प्रणिता ससाणे, संगीता वाघमारे, मनिषा कोकणे, वनिता कांबळे, ज्योती धन्वे, वनिता लातुरकर, भगवती परदेशी, लक्ष्मी गायकवाड, आशा उजगरे, कल्पना शिंदे इ. जिल्हा तालुका पदाधिकारी सभासद यांनी केले आहे.