Site icon सक्रिय न्यूज

पप्पू कागदे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवावी….!

केज दि.१७ – मराठा आरक्षण, शाळा व सरकारी नौकऱ्यांचे खाजगीकरण आणि दुष्काळ प्रश्नी हे शिंदे- फडणवीस पवार हे सरकार कुचकामी असून मराठा, ओबीसी व दलित विरोधी असल्याचा घणाघात रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केज येथील मोर्चा नंतर झालेल्या सभेत केला.
                   १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी रिपाइं (ए) च्या वतीने गायरानधारक दिन दलित, भूमिहीन यांच्या न्याय व रास्त मागण्यासाठी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर चौकातून प्रचंड मोर्चा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला पुरुष व तरुण हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी असलेल्या मोर्चेकऱ्यांनी हातात निळे झेंडे आणि पप्पू कागदे यांचे पोस्टर्स घेऊन गायरान आमच्या हक्काचे, शाळा व नौकऱ्यांचे खाजगीकरण बंद करा, स्मशान भूमीवरी अतिक्रमणे हटावा यासह ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले. हा मोर्चा आंबेडकर चौक मंगळवार पेठ बस स्टँड मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला मोर्चा तहसिल कार्यलयावर येताच मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी पप्पू कागदे यांनी पालक मंत्री ना. धंनजय मुंडे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळ असताना देखील पालक मंत्र्यांचे अस्तित्व जाणवत नसून ते कुचकामी आहेत अशी टीका केली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. हे सरकार मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद निर्माण करीत आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊन ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमीत करण्यासाठी १९९० ऐवजी २००५  पर्यंत ची मुदतवाढ करण्याचा शासन निर्णय काढण्यात यावा. शाळा आणि नौकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण तात्काळ थांबावावे. स्मशान भूमीवरील अतिक्रमणे हटवावीत आणि केज शहरातील क्रांती नगर, रमाई नगर, बजरंग नगर येथील रहिवाशांना कबाले देऊन त्याची नोंद घ्यावी. बजरंग नगर येथील कचरा डेपो हटविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
            यावेळी जिल्हा सरचिटणीस राजु जोगदंड, मराठवाडा उपाध्यक्ष मझर खान, जेष्ठ नेते प्रभाकर चांदणे, मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, बंडू भाऊ बनसोडे, कपिल कागदे, सचिन कागदे, वाघमारे, मझर खान, प्रभाकर चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे (अंबाजोगाई), जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष दशरथ सोनवणे, लक्ष्मण सिरसाट, अजित सिरसाट, धोंडीराम गायसमुद्रे, माजी तालुकाध्यक्ष राहुल सरवदे, शहाराध्य भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, साखरे मामा, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, रमेश निशीगंध, विकास आरकडे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, राजेश सोनवणे, यांची उपस्थिती होती.संचलन गौतम बचुटे यांनी तर आभार दिलीप बनसोडे यांनी व्यक्त केले.
            दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दलितांना स्मशानभूमी उपलब्ध होत नसल्याने अंत्यविधी रोखले जातात हे लाजिरवाणे असून त्यासाठी पप्पू कागदे सारखा लोकप्रतिनिधी आमदार व्हायला हवा असे मत रिपाइंचे केज तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांनी व्यक्त केले.
शेअर करा
Exit mobile version