बीड दि.१७ – एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने वडवणी शहरात मटका बुकी ऑफिसवर धाड टाकून 2,88,430/ रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एकूण 78 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, दि.17 ऑक्टोबर रोजी पंकज कुमावत सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे वडवणी हद्दीत प्रॉपर वडवणी शहरात गणेश राजाभाऊ कुरकुटे, रा. काळा मारुती नगर, वडवणी हा काही लोकांना सोबत एकत्र घेऊन स्वतःचे व इतर लोकांचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या मटक्याचा अड्डा चालवीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, त्यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी वडवणी येथे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन 4.30 वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता तेथे गणेश राजाभाऊ कुरकुटे व इतर दहा लोक मटक्याच्या आकड्याची एजंट कडून आलेल्या चिठ्ठ्यांची मटका बुक्की ऑफिसमध्ये छाननी करीत असताना जागीच मिळून आले. मटका बुकी मालक गणेश कुरकुटे यांना विचारून व त्यांच्या ताब्यात मिळालेल्या मोबाईलच्या व्हाट्सअप चॅटिंग वरून त्याने 65 एजंट कडून दहा टक्के कमिशन वर मटक्याचा धंदा घेत असल्याचे सांगितले. तसेच सदर जागा ही बालाजी टकले याचे कडून जास्तीचे पैशावर भाड्याने घेतल्याचे सांगितले. सदर मटका धंद्याची फिरती कटिंग नितीन खोड राहणार बीड यास देत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस नाईक दिलीप गीते यांचे फिर्यादी वरून एकूण 78 जणांवर पोलीस ठाणे वडवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे,पोलीस अंमलदार बालासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, आशा चौरे, शमीम पाशा, गोविंद मुंडे, प्रकाश मुंडे, होमगार्ड चौरे यांनी केली.