बीड दि.२० – क्रिकेट विश्वामध्ये बीड जिल्ह्याचे नाव रोशन करणाऱ्या ज्योतीराम घुले यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग क्रिकेट संघ हा मैत्री सिरीज 2023 खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. आणि त्या ठिकाणी आपल्या निपुण कौशल्याने बांगलादेशमध्ये t10 आणि वन डे सिरीज जिंकत बांगलादेश मध्ये भारताचा झेंडा रोवला आहे.
बीड जिल्ह्यातील केज सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असलेला ज्योतीराम घुले हा भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. मागच्या काही वर्षांपासून दिव्यांग क्रिकेट संघामध्ये त्याने आपले नाव केले आहे. आणि अनेक देशांबरोबर खेळताना ज्योतीराम घुले याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक सिरीज जिंकलेल्या आहेत. मागच्या काही महिन्यांपूर्वी बांगलादेश संघ भारताच्या दौऱ्यावर आला असता औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेमध्येही बांगलादेश ला धूळ चारली होती. आणि मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ हा बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता. यावेळी त्या ठिकाणी वनडे, टी ट्वेंटी आणि टी10 अशा स्पर्धा झाल्या. यामध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने दोन्हीही सिरीज जिंकल्या आणि बांगलादेश मध्ये विजय प्राप्त केला. दरम्यान भारतीय दिव्यांग क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या चार खेळाडूचा समावेश आहे. तर बीड जिल्ह्यातील ज्योतीराम घुले आणि राजू चव्हाण हे दोन खेळाडू भारतीय संघात आहेत. दोघांनीही दमदार खेळ करत बीडचे नाव केले असून दोन्ही सिरीज आपल्या खिशात घातल्या आहेत. मात्र भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नसल्याने त्यांना तयारी करण्यासाठी ज्या सेवा सुविधा मिळायला पाहिजेत त्या अद्यापही मिळत नाहीत. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील या खेळाडूंना मदत करण्याचे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतीराम घुले यांनी केले आहे केले आहे.