केज दि.२० – सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाने शुक्रवारी (दि.२०) राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे उघडकीस आली आहे.
अरुण ठोंबरे (अंदाजे वय-३२) असे आत्महत्या केलेल्या सैनिकाचे नाव आहे. सायं ७ च्या दरम्यान त्याने त्याच्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपविले आहे. मागील ३ दिवसा पूर्वीच तो गावाकडे आला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्टच असून मृतदेह शवच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.