Site icon सक्रिय न्यूज

एएसपी पंकज कुमावत यांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई….!

बीड दि.१० – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या  पथकाने अवैध रित्या गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडुन एकूण किमती 1,00,80,150/- (एक कोटी अंशी हजार एकशे पन्नास  रुपये) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे.
           पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, चौसाळा कडून गेवराईकडे एक कंटेनर क्रमांक TS 07 UN  1894 हे गेवराई कडे गुटका घेऊन जात आहे.त्यावरुन  पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील कर्मचारी यांना सदर ठिकाणी पाठवून दिनांक 10/11/2023 रोजी  सकाळी बीड बायपासवर लक्ष्मी चौकामध्ये सदर कंटेनर ताब्यात घेऊन कंटेनर मधील सागर पान मसाला व गुटखा जप्त  करून मिळून आलेला एक आरोपी व ईतर दोन अशा एकूण तीन आरोपी वर गुन्हा दाखल केला.तसेच आरोपी कडून एकूण किमती 1,00,80,150/-(एक कोटी अंशी हजार एकशे पन्नास  रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 03 आरोपी विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल  केला  आहे.
                  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व ASP पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा यांनी केली.
शेअर करा
Exit mobile version