Site icon सक्रिय न्यूज

गुगलने सुरू केले विद्यार्थ्यांसाठी नवे ऍप

नवी दिल्ली | सध्या टाळेबंदी असल्यामुळे ऑफिसचं कामही घरून होत आहे. त्यात शाळाही बंद आहेत. विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. सध्या त्यांच्या मदतीला अनेक अ‌ॅप उपलब्ध आहेत. त्यातच आता गुगलने अनेक सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी The Anywhere School नावाच अ‌ॅप लाँच केलं आहे.

या अ‌ॅपमध्ये तब्बल नव्या ५० सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. वापरकर्ते याचा लाभ Google Meet, Google Classroom आणि G Suite अशा विविध अ‌ॅपमधून घेऊ शकतात. गुगलने या संदर्भात माहिती देताना सांगितलं, गुगलच्या या सुविधेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ओझं कमी करण्यात गुगलने काही प्रमाणात प्रयत्न केले आहेत. विद्यार्थी घरी अभ्यासासोबत अन्य गोष्टीही शिकू शकतात.

शेअर करा
Exit mobile version