मुंबई दि.16 – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज आमनेसामने आले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज मोठा राडा झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी गेले. एकनाथ शिंदे गेल्यावर्षीदेखील एक दिवस आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. पण एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावरुन निघून गेल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटात मोठा राडा झाला. हा राडा इतका मोठा होता की पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांनाही कठीण जात होती.