मुंबई दि.१८ – शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य काही नेत्यांवर 16 नोव्हेंबर रोजी एन.एम. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगतले जाते. मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून हि तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानंतर ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गुरूवारी (16 नोव्हेंबर) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून लोअर परेल रोडच्या दुसऱ्या लेनचं काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आलं होतं. या विरोधात मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आलेली बघायला मिळतंय. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून याविषयीची तक्रार एन एम जोशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे अन् ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन केल्यानं या नव्या वादाला सुरुवात झाली आहे.