बीड दि.21 – राज्य सरकारने सर्वसामान्यांना एक चांगली बातमी दिली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना भरीव मदत व्हावी याकरिता शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे.
या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबाला मिळणार आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना एक ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केली होती.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थीचा जन्माचा दाखला,
एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला,
लाभार्थी व पालकांचे आधारकार्ड, बँक पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र,
शाळेचा दाखला आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक आहे.