Site icon सक्रिय न्यूज

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता…..!

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता…..!

बीड दि.२६ – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला आहे.

               राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २६, २७ व २८ नोव्हेंबरला “यलो अलर्ट” जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

            दरम्यान, विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

शेअर करा
Exit mobile version