अंबाजोगाई दि.29 – गुंधा ता. लोणार जि. बुलढाणा येथे झालेल्या संपुर्ण महाराष्ट्रातुन क्रिडा क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या क्रिडा शिक्षकांचा वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पांडुरंग आश्रुबा केंद्रे रा. केंद्रेवाडी ता. अंबाजोगाई यांची निवड करण्यात आली.आ. बच्चु कडु यांच्या हस्ते पांडुरंग आश्रुबा केंद्रे यांना क्रिडा रत्न क्रिडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वीही केंद्रे यांना आदर्श क्रिडा, युवा क्रिडा, कोरोना योध्दा, ए पी जे अब्दुल कलाम इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत. तर कुस्ती मल्लविद्या ता. अध्यक्ष, इंग्लिश मेडियम असोसिएशन अंबाजोगाई ता. अध्यक्ष अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.