Site icon सक्रिय न्यूज

निसर्गाची किमया न्यारी, गणपती बाप्पा अवतरले भारी….!

निसर्गाची किमया न्यारी, गणपती बाप्पा अवतरले भारी….!

केज दि.१ (बळीराम लोकरे) – आजपर्यंत आपण अनेक वस्तू, पदार्थ तसेच भाज्यां मध्ये वेगवेगळ्या देवतांचे रूप आपल्याला पहावयास मिळाले आहे.अशाच प्रकारची निसर्गाची न्यारी किमया माळेगाव (ता केज )येथे पहावयास मिळाली. येथील बाळू दोडके यांच्या शेतात पपईच्या झाडाला फळाच्या स्वरूपात नैसर्गिकरित्या आकर्षक सुंदर सोंड, कान, डोके ,तोंड अशी हुबेहूब गणपती बाप्पा सारखी दिसणारी दुर्मिळ प्रतिमा तयार झाली आहे. एखाद्या देवतांच्या स्वरूपात प्रतिमा तयार होणे ही नागरिकांसाठी श्रद्धेची बाब आहे.या गणपतीचे आगळंवेगळं रूप पाहण्यासाठी गावातील लोक शेतात धाव घेत आहेत.

वैज्ञानिक दृष्ट्या सजीवात पक्षी, प्राण्यात गुणसूत्रात बिघाड झाल्यास त्याचे वेगळे रूप तयार होते त्याच प्रमाणे फळामध्ये सुद्धा असा बदल दिसून येत आल्याचे अभ्यासक सांगतात.

शेअर करा
Exit mobile version