Site icon सक्रिय न्यूज

मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न….!

अंबाजोगाई दि.५ – घाटनांदूर येथे आयोजित मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ग्रंथालयांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात आग्रहाने मांडण्यास मी कटीबध्द आहे अशी नि:संदिग्ध ग्वाही शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.
                     यावेळी मंचावर माजी आ.गंगाधर पटणे, माजी आ.संजय दौंड, सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रवादी परळी विधानसभाध्यक्ष गोविंद देशमुख, माजी बीड जिप अध्यक्ष शिवाजी सिरसाठ, महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, सहा.ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, स्वागताध्यक्ष सुधीर चाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.विक्रम काळे यांनी “अधिवेशन पत्रिकेवर नांव नसताना सन्मित्र गोविंदभैय्या देशमुख यांच्यामुळे मी अधिवेशनास उपस्थित आहे. ग्रंथालयांनी सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत. मी दर्जावाढ, किमान वेतन आणि नविन ग्रंथालयांना मान्यता” याबाबत आपले प्रश्न विधीमंडळासह शासन दरबारी आग्रहीपणे मांडण्यास वचनबध्द आहे, असे प्रतिपादन केले. आरंभी सत्तेचाळीसाव्या मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या अधिवेशनानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वर कन्या प्रशाला, वसुंधरा महाविद्यालय व शंकर विद्यालयाच्या विद्यार्थी-शिक्षकांसह ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी राज्याध्यक्ष गजाजन कोटेवार यांनी ग्रंथालयाची दुरावस्था व प्रश्नांवर अभ्यासपुर्ण प्रकाश टाकुन ग्रंथालय संघ पदवीधर मतदार संघात आपल्यासोबत असेल असे स्पष्ट केले तर मा.आ.गंगाधर पटणे, मा.आ.संजय दौंड, नंदकिशोर मुंदडा आदींनी समयोचित विचार मांडुन अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य दि.ना.फड, अविनाश भारती, दत्ता वालेकर, नृसिंह सुर्यवंशी व गोविंद महाराज केंद्रे आदींना संत गुरुदेव तुकडोजी महाराज आदर्श सामाजिक कार्य पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनास मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातुन हजारो ग्रंथालय प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वागताध्यक्ष सुधिर चाटे तर सुत्रसंचलन गोविंद महाराज केंद्रे यांवी केले.
             दरम्यान, ग्रंथालय चळवळीसाठी समर्पित ग्रंथमित्र नरहरी शहाने मंठेकर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ आणि वसुंधरा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके, पुष्पहार व मानपत्र देवुन त्यांचा सपत्निक सत्कार व ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी अनेक संस्थांनीसुध्दा नरहरी मंठेकरांचा सत्कार केला.
शेअर करा
Exit mobile version