Site icon सक्रिय न्यूज

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या हस्ते व्यासपीठ उभारणीचे भूमिपूजन….!

केज दि.८ – मंगळवार दि.१२ रोजी बोरी सावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार असून या सभेच्या व्यासपीठाची उभारणी शुक्रवारी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला शर्मिला संतन देशमुख व लक्ष्मीबाई अच्युत मुळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.
           १४५ एकरात या सभेचे पार्किंग सह नियोजन करण्यात येत असून या सभेसाठी तब्बल ३ हजार स्वयंसेवक या ठिकाणची व्यवस्था व समाजाच्या सोयीसाठी असणार आहेत. सभास्थळाच्या तिन्ही मार्गावर स्वतंत्र व भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सभेच्या ठिकाणापासून दोन की.मी. अंतरावर या पार्किंग असणार आहेत तसेच सभा सकाळी १० वाजता असली तरीही सभेच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी व नाश्त्याची सोय करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणारे मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्यातील शेवटच्या दिवसातील  दौरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पहिल्या सभेने होत आहे. 30×20  मुख्य व्यासपीठाची उभारणीचे कामाचे शुक्रवारी दि.८ रोजी भूमिपूजन करण्यात आले. मराठा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन महिलांनी शर्मिला संतन देशमुख लक्ष्मीबाई अच्युत मुळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन संपन्न झाले मंगळवारी दि.12 रोजी सकाळी 10 वाजता अंबाजोगाई- कळंब राज्य मार्गावरील  बोरीसावरगाव -बनसारोळा रस्त्या लगत ही सभा होणार असून सभेला मोठ्या संख्येने तालुक्यातील समाज बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version