केज दि.30 – आठवडी बाजार करून एक महिला गावाकडे जात असताना पाठीमागून मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने सदरील महिलेवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम ही पळवली.
तालुक्यातील विडा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो वाड्या वस्ती वरील लोक बाजाराला येतात.आणि आंधळेवाडी येथील कुशाबाई विश्वनाथ आंधळे ही महिलाही बाजार करण्यासाठी आली होती. परंतु सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान जेव्हा सदरील महिला आंधळेवाडी या आपल्या गावाकडे निघाली तेव्हा पाठीमागून मोटरसायकलवर एक अज्ञात चोरटा आला आणि त्याने सदरील महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने व महिलेजवळ असलेली रोख रक्कम ही पळवली. सदरील घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी सदर महिलेला विडा येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ केले आणि प्राथमिक उपचार झाल्यानंतर सदरील घटनेची तक्रार देण्यासाठी महिलेला केज पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.