Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात 614 पैकी 507 अहवाल निगेटिव्ह, देशाच्या मृत्यू दरातही घट

केज दि.15 – बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या दि.14 रोजी रात्री 10.30 वाजता आलेल्या अहवालात एकूण पाठवलेल्या 614 अहवालापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आले असून 98 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले असून 9 अहवाल अनिर्णित आहेत. 

शुक्रवारी रात्री 10.30 वाजता जे अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये जिल्ह्यात एकूण 98 रुग्ण बाधित आढळून आले असून 507 अहवाल निगेटिव्ह आले असून बाधितांचा आकडा शंभरच्या आत आल्याने सदरील बाब दिलासादायक आहे. मागच्या तीन चार दिवसांपूर्वी बाधित रुग्णांचा आकडा वाढलेला दिसून येत होता. मात्र बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

कोरोनाची बाधितांची आकडेवारी समोर येत असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 71.17 टक्क्यांवर आले असून मृत्यूदरही 1.95 टक्क्यांवर आल्यानं देशभरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. काल दिवसभरात तब्बल 55 हजार 573 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानं कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही 17 लाख 51 हजार 555 इतका वाढला आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्याचा नवा विक्रमही नोंद झाला आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 8 लाख 48 हजार 728 चाचण्या करण्यात आल्यानं देशात  2.76 कोटी चाचण्या पार पडल्या आहेत. 10 लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन सरासरी 603 चाचण्या घेतल्या जात आहेत. WHO च्या निकषानुसार हे प्रमाण 140 चाचण्या इतकं असावं असं सांगण्यात येतं आहे. यानुसार 34 राज्यांमध्ये दररोज राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या होत असल्याची दिलासादायक बाबही समोर आली आहे.

शेअर करा
Exit mobile version