केज दि.6 – अखिल भारतीय काँग्रेस समितीद्वारे आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडुकीसाठी तयारी सुरू केली असून निवडणुकीच्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, दमन – दीव आणि दादरा नगर हवेली या राज्यासाठी नुकतीच स्क्रीनिंग कमिटी निवडण्यात आली असून पक्ष अध्यक्ष व पक्ष नेतृत्व यांनी राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, समितीच्या माध्यमातून आता सबंधित राज्यात लोकसभेच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार असून पक्षातील ही मोठी जबाबदारी असल्याने या निमित्ताने पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने रजनीताई पाटील यांच्यावर मोठा विश्वास टाकल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.