केज दि.7 – केज येथील न्यायालयात विधीज्ञ म्हणून काम करणारे आणि सर्वांशी हसून खेळून राहणारे तरुण विधीज्ञ ऍड. बाळासाहेब हिरवे यांचे अकाली निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील कळमआंबा येथील रहिवासी ऍड. हिरवे हे मागच्या काही वर्षांपासून केज न्यायालयात एक प्रसिद्ध वकील म्हणून नावारूपाला आले होते. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संपर्क वाढला होता. मात्र शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वकील संघासह तालुक्यातील मित्रपरिवारांमधून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर त्यांच्या कळंबा या मूळ गावी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा.बी.जे. हिरवे यांचे ते लहान बंधू होते.