केज दि.12 – बीड येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून सदरील मेळाव्याला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज संघटनेच्या वतीने अनंत राऊत यांनी केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता त्यांना एक वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावु नये या विविध मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या वतीने बीडमध्ये ओबीसी महा एल्गार मेळाव्याचे आयोजन दिनांक 13 जानेवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांनी या मेळाव्याला आपापली दुकाने एक दिवस बंद ठेवून हजारोच्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन केज तालुका नाभिक संघटनेच्या वतीने अनंत राऊत यांनी केले आहे.