केज दि.15 – शुक्रवारी दि.14 रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब चे अहवाल प्राप्त झाले असून पाठवण्यात आलेल्या एकूण 450 स्वॅब पैकी 83 पॉजिटिव्ह समोर आले आहेत. तर यापैकी
दरम्यान केज तालुक्यात शुक्रवारी रात्री पर्यंत 183 रुग्णांची नोंद झाली असून 68 रुग्ण बरे झाले असून 109 रुग्ण उपचाराखाली आहेत तर 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली असून नागरिकांनी घाबरून न जाता काही लक्षणे दिसून आली तर आरोग्य कार्यालयाशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
बीड शहराप्रमाणे केज शहरातही दि.17 रोजी शहरातील तिरुपती मंगल कार्यालय, जि. प. मा.शाळा, वसंत विद्यालय तसेच सरस्वती कन्या प्रशाला या चार ठिकाणी अँटीजन टेस्ट ची मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीतजास्त व्यावसायिकांनी आपल्या संघटनेच्या वतीने नाव नोंदणी करून आपली टेस्ट करून घ्यावी अन्यथा जे व्यापारी टेस्ट करून घेणार नाहीत त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याची तसेच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.