केज दि.२१ – येथील छोटे व्यापारी व टपरीधारक संघाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघाच्या अध्यक्षपदी सय्यद माजीद यांची तर उपाध्यक्ष विठ्ठल सत्वधर, सचिव शफीक शेख यांची बिनविरोध निवड झाली. केज शहरात टपरीधारकांसाठी हक्काची जागा नाही. पर्यायी जागेसाठी छोट्या व्यापाऱ्यांनी ४० वर्षात अनेक आंदोलने केली. मात्र त्यांना अजूनही जागा मिळालेली नाही. जुन्या संघटना संपुष्टात आल्यामुळे नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. संघात सहसचिव अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष मुजफ्फर खतिब, सदस्य रईस मोमिन, विशाल क्षीरसागर, कुरेशी बिलाल, आसिफ तांबोळी, शकील कादरी, आशाबाई चाटे यांची निवड करण्यात आली.