Site icon सक्रिय न्यूज

आयपीएस पंकज कुमावत यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती…!  

केज दि.३१ – मागच्या काही महिन्यांमध्ये केज उपविभागासह बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे एएसपी पंकज कुमावत यांना अखेर पदस्थापना देण्यात आली असून ते आता अमरावती जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

             आयपीएस पंकज कुमावत हे मागच्या दोन वर्षांपूर्वी केज उपविभागाला प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिसात अधीक्षक म्हणून दाखल झाले. आणि दाखल झाल्यापासूनच त्यांनी कारवायांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. अतिशय धडाकेबाज कारवाया केल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच केज उपभो उपविभागासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. कुमावत हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी बाहेर जिल्ह्यातही कारवायांचा धडाका सुरू केला आणि काही दिवसातच पंकज कुमावत यांची जरब गुन्हेगारांवर बसली. अवैध गुटखा असेल वाहतुकीचा प्रश्न असेल, मटका जुगार इत्यादी प्रश्नांवर त्यांनी धाडसी कारवाया केल्याने कित्येक गुन्हेगार तर जिल्हा सोडून गेले होते. मात्र मागच्या तीन महिन्यांपूर्वी त्यांची केजहून बदली  झाली आणि तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांना अमरावती येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती मिळाली आहे.                                                                 दरम्यान, केज उपविभागाला मिळालेल्या धाडसी पोलीस अधिकाऱ्यांपैकी पंकज कुमावत हे नाव बीड जिल्ह्याला कायम स्मरणात राहील.आणि केजला रुजू झालेले एएसपी कमलेश मीना यांच्याकडूनही कुमावत यांच्या सारख्याच कारवायांची अपेक्षा आहे.
शेअर करा
Exit mobile version