Site icon
सक्रिय न्यूज

बाळासाहेब ओव्हाळ यांची केज तालुका सरचिटणीस म्हणून निवड….!

केज दि.१४ – मागच्या अनेक वर्षांपासून दलित चळवळीमध्ये अग्रेसर असणारे बाळासाहेब ओव्हाळ यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

           बाळासाहेब ओव्हाळ हे मागच्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आलेले आहेत. गरजूंच्या हाकेला सदैव तत्पर असणारे बाळासाहेब ओहाळ हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा मंत्री रामदास आठवले यांच्या विचाराला चालना देणारे आणि त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत रुजवणारे कार्यकर्ते म्हणून तालुक्यात परिचित आहेत.
             ओव्हाळ यांच्या याच कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप हजारे यांनी ओहाळ यांची केज तालुका सरचिटणीस म्हणून निवड केली आहे.तसेच पक्ष संघटन आणि दलित चळवळ पुढे घेऊन जाण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नियुक्ती पत्रावर रिपाई चे केज तालुका अध्यक्ष सुनील हिरवे तसेच उपाध्यक्ष व्यंकटराव हजारे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
शेअर करा
Whatsapp
Facebook
Twitter
Exit mobile version