Site icon सक्रिय न्यूज

लहान वयापासूनच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे – डॉ.विकास आठवले….!

केज दि.१५ – राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथे पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी जंतनाशक गोळ्या वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

              शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नयेत, त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, शारीरिक तसेच मानसिक वाढ ही सुदृढ असावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये मध्यान भोजन, हिमोग्लोबिनच्या गोळ्यांचे वाटप, जंतनाशक गोळ्यांचेही वाटप केल्या जाते. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये डॉ. विकास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये गोळ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. आठवले यांनी सदरील गोळी कशी घ्यावी आणि याचे काय फायदे आहेत ? आणि लहान वयापासूनच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि पालकांनीही कशाप्रकारे काळजी घ्यावी याचीही सविस्तर माहिती दिली.
                   सदरील कार्यक्रमासाठी डॉ. आठवले यांच्यासह डॉ. सचिन सूर्यवंशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी.एच. लोमटे व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version