Site icon सक्रिय न्यूज

जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते – नरहरी काकडे….!       

केज दि.१६ – तालुक्यातील कानडीमाळी येथील कानेश्वर विद्यालयाच्या वतीने आरोग्य विभागात वर्णी लागलेल्या विद्यार्थिनीच्या सरकारचे आयोजन करण्यात आले होते.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संतोष गरडे, आदर्श शिक्षक नरहरी काकडे, सहशिक्षक अरुण गिते, सचिन खाडे यांची उपस्थिती होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कानेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थींनी प्रतिक्षा भिमराव राऊत हिची आरोग्य सेवक म्हणून धाराशिव येथे निवड झाली म्हणून कानेश्वर विद्यालयाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  प्रतिक्षा राऊत हिने कानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना आलेले अनुभव व्यक्त केले.
              दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनीही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन व प्रस्ताविक आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन खाडे यांनी मानले.
शेअर करा
Exit mobile version