Site icon सक्रिय न्यूज

पैठण (सा.) येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांची तपासणी….!

केज दि.२२ – तालुक्यातील पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन पैठणचे भूमिपुत्र डॉ. कैलास पैठणकर बीड यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले होते.
                  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आलेल्या शिबिरात पाचसेच्या वर रूग्णांनी लाभ घेतला. प्रती वर्षा प्रमाणे याहि वर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, गुणवंतांचा गुण  गौरव सोहळा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. यात दोन लाख रु किंमतीची औषधे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आली शिबिरात डोळे, पोटाचे आजार, स्त्रीयांचे आजार इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांनी देखील झोप न येणे, स्वप्नं पडणे आदी रुग्णांना मोफत तपासले.
                          यावेळी डॉ.चंद्रकांत गायकवाड, डॉ.खिराजी पाखरे, डॉ.सुदाम मोगले, डॉ.कैलास पैठणकर, डॉ.अनिमेश पैठणकर, डॉ. सुरज जाधव औषधनिर्माताअतुल दाभाडे, ब्रदर शिवाजी मस्के, डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार केले.दरम्यान,  माझ्या जन्म भुमीतील गोरगरीब रुग्णांना पोटाचे विकार असतील अशा सर्व रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. अशा रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.कैलास पैठणकर यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version