बीड दि.२६ – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. भांबेरीवरुन गावावरुन ते परत अंतरावाली सराटीत दाखल झाले आहेत. त्यानंतर मराठा आंदोलकांचे लक्ष पुन्हा जालना आणि बीड जिल्हा राहणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर अफवा पसरू नये यासाठी तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
अंतरावलीकडे मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक पोहचली आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्याकडे आले आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही. मनोज जारांगे यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यावर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. परंतु त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित करत पुन्हा अंतरवाली सराटी गाठले. त्यानंतर पोलिसांनी बीड, जालना जिल्ह्याची बॉर्डर सील केली आहे. बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्वच वाहनांची आता तपासणी केली जात आहे. बीड जिल्ह्यात 37 (1) (3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. तिन्हीही जिल्ह्यांत परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश नाही.
दरम्यान, भांबेरीवरुन माघारी परतल्यानंतर जरांगे पाटील यांनी परत एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करायला सुरुवात केली आहे. तसेच ते वैद्यकीय उपचारही घेत आहेत. परंतु अंबड तालुक्यात संचार बंदी असल्याने कोणीही उपोषण स्थळी थांबू नये, आशा सूचना जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.