Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात मनाई आदेश जारी….!

बीड जिल्ह्यात मनाई आदेश जारी….!

Breaking news logo. Flat illustration of breaking news vector logo for web design

बीड दि.२९ – मराठा ओबीसी,धनगर व इतर समाजाचे विविध उपोषण,आंदोलने,सभा सद्या सुरु असून जिल्हयात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको या सारखे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवा यासाठी जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.

आगामी कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून 10 व 12 वीच्या शालांत परिक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरु आहे. दि.29 फेब्रुवारी ते दि.14. मार्च या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1) (3) अन्वये काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आली आहे. या अन्वये शस्त्र, सोटे ,काठी, तलवार, बंदूक, लाठया, काठया, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर क्षेपाणस्त्रे, शरीरास इजा होणा-या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल, किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये.

जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती,किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही.

दरम्यान, कोणताही मोर्चा, सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजूरीशिवाय 15 दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अमलात राहणार नाही.

शेअर करा
Exit mobile version