Site icon सक्रिय न्यूज

महिलांनी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा – सरपंच जनाबाई काकडे…! 

केज दि.८ – तालुक्यातील  साबला येथे  जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच जनाबाई काकडे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी सरपंच कलावती नाईकनवरे, डॉ. प्रियदर्शनी गायकवाड, आंगनवाडी शिक्षिका सुनंदा  काकडे,  आरोग्य सेविका वर्षा काकडे या होत्या.
               कार्यक्रमाची सुरुवात  राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहे, क्रांतिज्योती सावित्रीबार्ड फुले,  स्व . विमलताई मुंदडा  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागतिक महिलादिन ” या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा  सत्कार  या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच जनाबाई काकडे हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमती काकडे यांनी जगतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करतांना म्हटले की,  या जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर महिलांनी स्वत: चे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. तसेच सर्व महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे. एखादा छोटा मोठा उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे काम केले जाईल असे आश्वासनही यावेळी दिले. महिलांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे .
                यावेळी काशिबाई राऊत, पुजा पांचाळ, भाग्यश्री मुळे, अनिता शिंदे, सिता काकडे, राधा काकडे, इंद्रायणी काकडे, अनिता काकडे, कांताबाई काकडे, गवळणबाई परळकर, अल्काबाई काकडे यांच्यासह धर्माळा येथील महिला उपस्थित होत्या त्यांचाही  सत्कार करण्यात आला.
            दरम्यान, जागतिक महिलादिन यशस्वी करण्याचे काम ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , राहुल मुळे, माऊली नाईकनवरे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती केज धनराज सोनवने यांनी मानले.
शेअर करा
Exit mobile version