केज दि.१४ – इयत्ता १२ वीची परीक्षा देत असलेल्या १७ वर्ष सहा महिने वयाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
केज तालुक्यातील एका गावातील १७ वर्ष सहा महिने वयाची मुलगी ही दुसऱ्या गावातील परीक्षा केंद्रावर इयत्ता १२ वीची परीक्षा देत होती. ६ मार्च रोजी रात्री सदरची मुलगी ही आई – वडिलांसोबत जेवण करून झोपली. मध्यरात्री २ वाजता तिचे वडील लघुशंकेसाठी उठले असता त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने शेवटी तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सदर मुलीचा रंग गोरा, कपाळावर टिकली, अंगात पिवळसर रंगाचा टॉप व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, निळसर रंगाचा जॅकेट, पायात चप्पल अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास युसुफवडगाव ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी केले आहे.