Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलाची आत्महत्या…..?

केज दि.२१ –  आत्याकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली आहे.
              सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील दिपक उर्फ दिप सचिन अकलूजकर याचे वडील कोरोनामध्ये मयत झाले होते. तसेच त्यानंतर आईने देखील दुसरे लग्न केल्याने अनाथ असलेल्या दिपक उर्फ दिप सचिन अकलूजकर याला त्याची आत्या उषा मोहिते यांनी चिंचोली (माळी) ता. केज येथे शिक्षणासाठी आणले होते. दिपक उर्फ दिप सचिन हा कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी येथे ७ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
                   दरम्यान २१ मार्च रोजी सकाळी  १०  वा. च्या सुमारास दिपकने आत्याच्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात नायलॉनच्या  दोरीने अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू वृत्तीचा होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त आहेत होत आहे. या प्रकरणी त्याचे मामा विकास तुकाराम मोहिते यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version